कोकण

दमदार पावसानंतरही जुगबुडीची पाणीपातळी घटली

CD

-rat३p२८.jpg-
P२४N१५९७३
खेड ः जगबुडी नदीची घटलेली पाणी पातळी.
---------
पावसानंतरही जुगबुडीची पातळी घटली

खेडमध्ये ४४१७ मिमी पाऊस ः टंचाईची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : तालुक्यात यंदा मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. सलग दोनवेळा जगबुडीच्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले. ६ ते ७ वेळा पूरसदृशस्थितीही निर्माण झाली होती. चारच दिवसांपूर्वी परतीच्या पावसानेही दाणादाण उडवत मटणमच्छी मार्केटपर्यंत पाणी मार्केटमध्ये घुसले होते. आतापर्यंत तालुक्यात ४४१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊनही सद्यस्थिती भरणेतील जगबुडी नदीपात्रातील पाणीपातळी घटली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्राने आजवर नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहे. यंदा जगबुडी नदीपात्रातील काहीअंशी गाळ उपसण्यात आल्याने पुराचा धोका टळेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे बाजारपेठेत दोनवेळा पुराचे पाणी घुसून व्यापाऱ्यांची हानी झाली. नदीकाठच्या रहिवाशांच्या घरांमध्ये ही पाणी घुसले. नारिंगी नदीही जलमय होवून खेड, दापोली, मंडणगड व खाडीपट्ट्यातील वाहतूक ठप्प झाली होती. नारिंगी सभोवतालची भातशेती ही पुराच्या पाण्यात राहिल्याने नासाडी झाली. मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतरही येथील जगबुडी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पातळी कमी झाल्याने झाडेझुडपे दृष्टीस पडत आहेत. पाणीसाठ्यात घट झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर अखेरीसपर्यंत पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावले असले तरी जगबुडी नदीपात्रात आतापासून पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला असून पाणीटंचाईचे संकट उभे राहू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT