कोकण

३८० जणांना सर्पदंश, १ हजार ४०९ जणांना श्वानदंश

CD

जिल्ह्यात पाच महिन्यात ३८० जणांना सर्पदंश

श्वानाचा १४०९ जणांना चावा; लस उपलब्धतेने जीवितहानी ठरली

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 3 : जिल्ह्यात सर्पदंश, श्वानदंश प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच महिन्यात ३८० जणांना सर्पदंश झाला तर १ हजार ४०९ जणांना श्वानदंश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्पांच्या भीतीबरोबर श्वानांची प्रचंड दहशत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सर्व आरोग्य विभागांमध्ये याची मुबलक लस उपलब्ध असल्याने एकाचाही मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय चालतो. दुबार पिके घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. ग्रामीण भागात मशागतीसाठी शेतीची भाजावळ करण्यापर्यंत अनेक उद्योग सुरू असतात. शेतकऱ्‍यांना त्यासाठी जंगलात जावे लागते. दुग्ध व्यवसायासाठी गुरे पाळून ती चरवण्यासाठी जंगलात जावे लागते. थेट जंगलाशी संबंध येत असल्याने सर्पदंशाचे प्रकार वाढतात. गेल्या वर्षी नऊ महिन्यांमध्ये ६३० जणांना सर्पदंश झाला होता; परंतु आता गेल्या पाच महिन्यांमध्ये ३८० जणांना सर्पदंश झाला आहे. यामध्ये दापोली, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यात सर्वांत जास्त संर्पदंशाचे प्रमाण आहे.
जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशतही कायम आहे. शहर आणि ग्रामीण भागात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. शहरामध्ये नसबंदीचे प्रयोग करण्यात आले असले तरी पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची अनेक उदाहरणे आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांचे माणसांवरील हल्ले वाढले आहेत. गेल्या वर्षभरात ३ हजार १५० जणांना श्वानदंश झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली; मात्र रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये रेबीज (श्वानदंश) लसीचा तुटवडा होता; परंतु आता लस उपलब्ध झाली आहे. या वर्षामध्ये गेल्या पाच महिन्यात १ हजार ४०९ जणांना श्वानदंश झाला आहे. यामध्ये दापोली, गुहागर, संगमेश्वर तालुक्यात सर्वांत जास्त श्वानदंश झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT