कोकण

शिवव्याख्याते बानगुडे-पाटील रविवारी मालवणात

CD

16030

शिवव्याख्याते बानगुडे-पाटील रविवारी मालवणात
नितीन वाळकेः शिवप्रेमींना उपस्थितीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ः शहरातील राजकोट किल्ला येथील शिवपुतळा कोसळण्याच्या प्रकरणामध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्यांची नावे समोर येवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत एक शिवप्रेमी नागरिक आणि शिवसैनिक म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत. यासाठी ज्या ज्यावेळी आवश्यकता भासेल त्या त्यावेळी आम्ही लढण्यासाठी सज्ज असणार आहोत. याच विषयासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करून पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे रविवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता बंदरजेटी याठिकाणी जाहीर सभेसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले.
येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपशहप्रमुख बंड्या सरमळकर उपस्थित होते.
शिवव्याख्याने पाटील यांचे शिवसेनेच्यावतीने कुंभारमाठ याठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुचाकी रॅलीने बंदरजेटी याठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त गर्दीमध्ये त्यांचे विचार ऐकण्यात येणार आहेत. शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर पाटील हे मालवणमध्ये येण्याचे निश्चीत झाले होते. त्यानुसार त्यांचा दौरा ६ ला निश्चीत झाला असल्याचे वाळके यांनी सांगितले.
शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शिवसन्मान यात्रेतून निषेध मोर्चा, जाहीर सभा असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. आता शिवव्याख्याते पाटील यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पाटील यांनी शंभुराजे या महानाट्याची निर्मिती केली आहे. त्यांनी रौद्र ही शंभुराजेंवर कादंबरी लिहिली आहे. यशाचा पासवर्ड यासारखी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही लढण्यासाठी सज्ज राहणार आहोत, असेही श्री. वाळके यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT