कोकण

तीन पत्ती जुगारावर सावंतवाडीत कारवाई

CD

तीन पत्ती जुगारावर
सावंतवाडीत कारवाई
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः शहरातील बाहेरचावाडा येथे तीन पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह दोन लाख ५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात मोबाईलसह स्कूटरचा समावेश आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २) रात्री उशिरा करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
सावंतवाडी बाहेरचावाडा येथील एका बिल्डिंगच्या मागे असलेल्या रहिवासी इमारतीत तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या जुगारावर छापा टाकला. या कारवाईत २ लाख ५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संदेश बिडये, विनायक पराडकर, राहिल लिंगप्पा राठोड, बॉबी फिलिप्स परेरा, याकूब शहान शेख आदी संशयितांवर मुबई जुगार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरिक्षक सरदार पाटील करीत आहेत. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT