कोकण

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

CD

N16081

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
वेंगुर्लेतील घटनाः दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ः शहरातील पॉवरहाऊस नाका येथून आपल्या घरी चालत जात असताना भरधाव वेगातील दुचाकीने दिलेल्या धडकेत वृध्दाचा मृत्यू झाला. नारायण रामा पालयेकर (वय ७६ रा. दाडाचेटेंब) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (ता. २) रात्री ८.३० च्या सुमारास घडली होती. या अपघातप्रकरणी दुचाकीस्वार पुंडलिक कृष्णा हळदणकर याच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ः नारायण पालयेकर हे काल रात्री ८.३० च्या सुमारास कॅम्पकॉर्नर नाका येथून चालत आपल्या घरी जात होते. काही अंतरावर वेंगुर्ले ते तुळस जाणारे रस्त्यावर रामघाट रोड दाडाचेटेंब म्हाडा कॉलनी बाजुच्या डांबरी रस्त्यावर डाव्याबाजूला असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना ठोकरले. या अपघातात ते हे रस्त्याच्या डाव्या बाजूस पडले. दुचाकीस्वार पुंडलिक हळदणकरही जखमी झाला. या अपघाताचा आवाज ऐकून कॅम्पकॉर्नर तिठा भागातील नागरीक धावत अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी पोलीसांना या अपघाताची खबर देत त्या दोघांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेले. अपघात झाल्याचे समजताच कॅम्प कॉर्नर परीसरातील नागरीकांनी रूग्णालयात धाव घेतली. वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्सनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रूग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, वाटेतच त्यांचे निधन झाले. दुचाकीस्वार पुंडलिक हळदणकरला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.दरम्यान, या अपघातप्रकरणी येथील पोलीसांना अपघातातील पल्सर दुचाकी (क्रमांक-एमएच०७ एल ४१४१) ताब्यात घेत दुचाकीस्वार पुंडलिक हळदणकर याच्यावर वाहन हयगयीने व अविचाराने आणि रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत नारायण पालयेकर यांच्या गंभीर दुखापतीसह मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT