कोकण

केसरकर

CD

आडाळीत तरुणांसाठी
चार दिवसांत उद्योग येणार
दीपक केसरकर; चार दिवसांत भूमिपूजन होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः दोडामार्ग आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. येत्या चार दिवसांत अडीचशे युवकांना रोजगार देणाऱ्या उद्योगाचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होईल. यावेळी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.’
ते म्हणाले, ‘‘४५ कोटी रुपये मंजूर असूनही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्न राजघराण्याच्या स्वाक्षऱ्यांअभावी रखडला आहे. येत्या दोन दिवसांत स्वाक्षऱ्या नाही झाल्यास हा प्रकल्प नाईलाजाने दुसरीकडे स्थलांतरित करावा लागेल, असेही ते म्हणाले.
श्री. केसरकर यांनी दूरचित्र प्रणालीद्वारे जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘‘आडाळी एमआयडीसी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फार्मासिटिकल कंपनी येणार आहे. कंपनीने आडाळी येथे येऊन पाहणी केली आहे. याआधी आडाळी येथे उद्योग सुरू करण्यास ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. काही प्रमाणात त्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी विधी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वीज, पाणी आदी सुविधांसाठी काम सुरू आहे. या ठिकाणी उद्योजकांकडून मोठा प्रतिसाद मिळणार असून, शासनही या संदर्भात कटिबद्ध आहे. तालुक्यातील आंबोली चौकुळ व गेळे येथील वन जमिनीचा प्रश्न सुटला आहे. त्या संदर्भातील ३५ सेक्शन उठवण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लढ्याला आता खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे.’’
ते म्हणाले, ‘‘शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचे भूमिपूजनही लवकर होणार आहे; परंतु ग्रामस्थांची हरकत असलेली नऊ हेक्टर जमिनी वगळण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत कुठलेही बांधकाम त्या भागात होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांची शंका दूर झाली असून, लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. माझ्या मतदारसंघात निविदा मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सर आणून दादागिरी केली जात असेल तर ती मी मुळीच खपवून घेणार नाही. पैशांची मस्ती चालू देणार नाही. अशा कोणत्याही ठेकेदाराला मी कधीच माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.’’
ते म्हणाले, ‘‘मल्टीस्पेशालिटी आणि सावंतवाडी बसस्थानक प्रश्न माझ्या आश्वासनापैकी पैकी राहिला आहे. तो सोडवणे माझे कर्तव्य आहे; परंतु मल्टीस्पेशालिटी संदर्भात वारंवार माझे प्रयत्न सुरू असताना आजही राजघराण्याकडून काही स्वाक्षऱ्या शिल्लक आहेत. तो प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागत आहे.’’
कोट
नारायण राणे कडवट शिवसैनिक होते. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. आता त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य शिंदे शिवसेनेत येत असेल तर त्यांचे नक्कीच स्वागत होईल.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT