16062
मठकर जयंतीनिमित्त
डॉ. हरम यांचे व्याख्यान
सावंतवाडी ः श्रीराम वाचन मंदिरातर्फे (कै.) सौ. विजयश्री मठकर जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.११) पुणे येथील प्रा. डॉ. नंदा हरम यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले आहे. ‘स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील विज्ञान’ हा व्याख्यानाचा विषय आहे. डॉ. हरम यांचे ‘अतुट नातं’ काव्यसंग्रह, मार्व्हल ऑफ सायन्स आणि इंजिनिअरींग केमिस्ट्री आदी पुस्तके प्रकाशित आहेत. प्रा. डॉ. हरम यांचा ‘अतुट नातं’ हा तिसरा काव्यसंग्रह आहे. यात विज्ञान कविता आहेत. परंतु, त्या विज्ञानाशी संबंधित नाहीत. प्रत्येक कविता प्रयोगशाळेतील प्रयोगांशी आणि प्रयोगशाळेत घडणाऱ्या गंमतीजंमतीशी संबंधित आहे. परंतु, त्या कवितेशेवटी येणार संदर्भ हा आपल्याला जीवनानुभव समजावून जातो. दोन पदार्थांची अभिक्रिया आणि त्याचा दोन माणसांतील ‘केमिस्ट्री’शी जोडलेला निकटचा संबंध किंवा घरातील गृहिणीची स्वयंपाकघरासारखी प्रयोगशाळा आणि तिचे कर्तृत्व असे अनेक किस्से यात येतात. विजयश्री मठकर यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी महिला अगर मुलांच्या समस्यांबाबत मठकर यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी ११ ला सायंकाळी ६ वाजता डॉ. हरम यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले आहे. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील आहेत. या व्याख्यानाचा लाभ घेण्यचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर आणि कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
---
16124
आनंद मेणसे यांचे
आज व्याख्यान
कणकवली : येथील गोपुरी आश्रमात उद्या (ता.५) सायंकाळी ४.३० वाजता ‘समजून घेऊन महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे हे विचार मांडणार आहेत. आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी ही माहिती दिली. महात्मा गांधी यांच्या जयंती सप्ताहानिमित्त गोपुरी आश्रमातर्फे आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात (वागदेतील नाईक पेट्रोल पंपाच्या मागे) हा कार्यक्रम होणार आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांमध्ये वैचारिक पातळीवर मतभेद होते. परंतु दोन्ही महामानव सत्य, अहिंसा, समाज परिवर्तन, अस्पृश्यता निर्मूलन याच विचारांचे काम करत होते. दोन्ही महामानवांच्या विचारांमध्ये एक प्रकारचे साधर्म्य होते. भारत देशाच्या घडणीमध्ये दोन्ही मानवांच्या विचारात कमालीची एकवाक्यता होती. हे समजून घेण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन आश्रम परिवारातर्फे आवाहन केले आहे.
-------
16077
आसोली देव नारायणाचा
१२ रोजी दसरोत्सव
वेंगुर्ले ः तालुक्यातील आसोली गावातील श्री देव नारायण पंचायतन देवस्थानचा दसरोत्सव १२ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आसोली येथे श्री देवी भूमिकादेवी मंदिरात आज घटस्थापना कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिरात दररोज ग्रामस्थांची भजने होणार आहेत. आसोली श्री देव नारायणाच्या दसरोत्सवाला पंचक्रोशीतून तसेच मुंबई, गोव्यातून असंख्य भाविक उपस्थिती दर्शवतात. पंचक्रोशीतील तसेच मुंबई आणि गोवा येथील भाविकांनी या दसरोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आसोलीतील गावकरी व मानकरी मंडळी, आसोली ग्रामस्थ आणि श्री देव नारायण पंचायतन देवस्थान कमिटी आसोलीतर्फे केले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.