

After Hormuz Trump eyes Malacca Strait major US Indonesia deal signed
Esakal
मध्य पूर्वेत तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक जवळपास ठप्प असताना आता दक्षिण पूर्व आशियातील मलक्का सामुद्रधुनी चर्चेत आली आहे. अमेरिका आणि इंडोनेशियात नुकत्याच झालेल्या एका संरक्षण करारामुळे जगभरात खळबळ उडालीय. अमेरिका आता जागतिक व्यापाराची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या प्रमुख समुद्री मार्गांवर आपलं नियंत्रण भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.