

After Benglore and Punjab Shocking Viral Clip From Mumbai's Mira-Bhayandar Sparks ‘Zombie Drug’ Fears in India
sakal
Zombie Drug in India: काही महिन्यांपासून भारतात झोंबी ड्रगचा वापर होत असल्याचा विषय चर्चेचा ठरत आहे. पंजाब मध्ये ब्लिंकइटचा डिलेव्हरी बॉय तब्बल दोन तास न हालचाल करत एकाच ठिकाणी उभा असलेला दिसला होता. त्याचसोबत बेंगळुरूमधला सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे सगळीकडे चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाला होता. आता अशीच घटना मुंबईच्या मिरा भाईंदरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे इतर राज्यांसह आपल्या राज्यात देखील ड्रग्सची तस्करी होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.