कोकण

‘कोकण विकास’तर्फे आज इन्सुलीत नवदुर्गेचा सन्मान

CD

‘कोकण विकास’तर्फे आज
इन्सुलीत नवदुर्गेचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून डोंगराळ व दुर्गम भागातील महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या नारीचा सन्मान म्हणजेच नवदुर्गेचा सन्मान उद्या (ता.५) सकाळी १० वाजता इन्सुली ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी १६ गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका उपस्थित असणार आहेत.
यावेळी कोकण संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय राणे, प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सौ. ममता भास्कर देसाई, प्रकल्प अधिकारी-एकात्मिक बाल विकास सेवा, संध्या मोरे, पर्यवेक्षिका-एकात्मिक बाल विकास सेवा, सौ. विद्या कोतगी,पर्यवेक्षिका-एकात्मिक बाल विकास सेवा, सौ. प्रीती प्रकाश दळवी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय प्रतिनिधी, दिपाली माळी, जिल्हा विकास अधिकारी, नाबार्ड आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आयोजित करण्याचे मुख्य उद्दिष्ट अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांचे अतुलनीय कार्य गौरविणे आणि त्यांना समाजात प्रोत्साहन देणे आहे. या सेविकांनी ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी लहान मुलांच्या पोषणाची काळजी घेतली असून, योग्य आहार आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली आहे. आशा वर्कर्स यांनी महिलांच्या आरोग्याच्या सुधारासाठी लसीकरण आणि पोषण आहार यांसारख्या सेवा दिल्या. त्यांच्या जनजागृती कार्यामुळे ग्रामीण समाजातील महिलांचे आणि मुलांचे जीवनमान सुधारले आहे. ‘लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. अशी अनेक कार्ये त्यांनी पार पाडली आहेत. म्हणूनच त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी या नवरात्रोत्सवामध्ये ‘सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गे’चा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT