- ratchl४४.jpg -
P२४N१६२०२
चिपळूण ः गोवळकोट रंगमंच उद्घाटनप्रसंगी आमदार निकम व मान्यवर.
गोवळकोमधील रंगमंचचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः गोवळकोट गावातील श्री देव सोमेश्वर व श्री देवी कारंजेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या रंगमंचचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी गोवळकोट गावच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन आमदार निकम यांनी दिले.
आमदार निकम यांच्या आमदार निधीतून संरक्षण कठडा व रंगमंचच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कारंजेश्वरी देवस्थान प्रमुख ग्रामस्थ यांच्या समवेत विकासाचा एक परिपूर्ण आराखडा तयार करून या गावाचा कायापालट करूया, त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत आपणा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे आवाहन निकम यांनी केले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, देवस्थानाचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर, विश्वस्त वसंत भैरवकर, राजू विखारे, महेश सागावकर, अजित पावसकर, सुभाष बुरटे, डॉ. शंकर जड्याळ, संतोष टाकळे, उपेंद्र हरवडे, ऋषी बुरटे, पांडुरंग भैरवकर, तुकाराम बेचावडे, प्रवीण रेडीज, अनंत भैरवकर, किरण बांद्रे, तुषार रेडीज, प्रवीण हरवडे आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.