-rat४p२५.jpg-
२४N१६२४८
सुनीता गोगटे
---------
लघुउद्योजिका सुनीता गोगटेंना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ४ : पावस पंचक्रोशीतील मावळंगे गावच्या लघुउद्योजिका सुनीता गोगटे यांना यावर्षीचा स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूप योगिनी पुरस्कार शनिवारी (ता. ५) प्रदान करण्यात येणार आहे. महिलांना सोबत घेऊन कोकणी मेवा उद्योग त्यांनी उभा केला आहे. त्या सामाजिक कामातही अग्रेसर असून त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या कोकणातील अनेक हंगामी फळांवर प्रक्रिया करून कोकणी मेवा करत आहेत. नवनवीन पदार्थ तयार करण्यावर त्यांचा भर आहे. त्याचबरोबर पारंपरिक कोकणी पदार्थही त्या विक्रीसाठी बनवतात. त्या वर्षभर विक्रीसाठी पारंपरिक फराळाचे पदार्थ आणि नावीन्यपूर्ण पदार्थही विक्रीसाठी बनवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.