कोकण

निवडणुकीदरम्यान अधिकारी, पोलिसांची भूमिका महत्वाची

CD

16286


निवडणुकीदरम्यान अधिकारी, पोलिसांची भूमिका महत्वाची

जिल्हाधिकारी अनिल पाटील ः जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश


सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांची भूमिका महत्वाची असते. निवडणुकीच्या कालावधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाचे नियोजन करुन ते काम वेळेत पूर्ण करणे करावे. केलेल्या कामांचा नियमित अहवाल देणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी आज दिले.
नियोजन सभागृहात क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी श्रीमती देसाई तसेच तहसिलदार आणि क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्री. अग्रवाल यांनी उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारे राखावी याबाबत मार्गदर्शन केले. मतदानाच्या पूर्वी, मतदानाच्या दिवशी आणि मतदान झाल्यावर क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी काय असते आणि ती कशा प्रकारे पार पाडायची याबाबत सखोल मार्गदर्शन केले. श्री. रावले यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करावा, त्या सूचनांचे तंतोतंत पालन कशा प्रकारे करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. शेवाळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्राथमिक कर्तव्ये, मतदान पूर्व जबाबदारी व कर्तव्ये, भेद्यता मॅपिंग म्हणजे काय, निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात कशा प्रकारे घ्याव्यात, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्हीएम बाबत डीईओ यांना द्यावयाची माहिती, मतदान केंद्रनिहाय भेद्यता ठरविण्यासाठी नमुना, मतदान दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी करावयाची कामे, मतदानाच्या दिवशी करावयाची कामे आदी विषयांची माहिती प्रशिक्षणादरम्यान सविस्तररित्या देण्यात आली.
---
सुक्ष्म नियोजनाच्या सूचना
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येक क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकाऱ्यांनी आपआपसात समन्वयाने काम करावे, प्रत्यक्ष मतदान केंद्राला भेट देऊन सर्व पाहणी करावी, देण्यात येत असलेल्या सुविधांची पडताळणी करावी, निवडणूक प्रक्रियेदरम्यान करावयाच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे, प्रत्येक काम वेळेत आणि चोखपणे पार पाडावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT