कोकण

कोकणात २९ हजार ५५० कोटींची मोठी गुंतवणूक

CD

उदय सामंत फोटो

कोकणात २९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक
साडेपाच हजार प्रत्यक्ष; ३३ हजार अप्रत्यक्ष रोजगार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात एमआयडीसी क्षेत्रांमध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे कोकणात २९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे ३८ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. सिलिकॉन वेफर्स आणि चिप्सच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रा. लि. तसेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्याची निवड केली आहे. स्टरलाइट कंपनीच्या ५५० एकर जागेचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
हे प्रकल्प उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प असून सिलिकॉन वेफर्स आणि चिप्सचे उत्पादन जागतिक स्तरावर करणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १९ हजार ५५० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होणार आहे. ५ हजार ६२० प्रत्यक्ष, तर २८ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरीमध्ये येत असलेला हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.
मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित प्रकल्पालाही मान्यता दिली आहे. हा प्रकल्प रत्नागिरीत होत असल्याने कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळू शकते. संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. ४५०० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. मेक इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी भारतीय उद्योजकांनाही मोठ्या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण दिले पाहिजे असं धोरण सरकारनने स्वीकारले होते.

कोट
सेमीकंडक्टर आणि संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याने या नवीन क्षेत्रातही महाराष्ट्राचा दबदबा तयार होईल, असा विश्वास आहे.
- उदय सामंत, उद्योगमंत्री

दृष्टिक्षेपात
प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी
वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रा. लि.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.ची गुंतवणूक
स्टरलाइटच्या ५५० एकर जागेचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT