कोकण

कुडाळेश्वर मंडळाने संत परंपरा जपली

CD

16776

कुडाळेश्वर मंडळाने संत परंपरा जपली

अॅड. सुहास सावंत ः कु़डाळात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता.६ ः महाराष्ट्राला सर्वांत मोठी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या परंपरेला भजनाच्या माध्यमातून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ जपत आहे. ही सर्वांत मोठी कौतुकाची बाब आहे, असे प्रतिपादन ॲड. सुहास सावंत केले. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित (कै.) अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. या भजन स्पर्धेची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे सुरू असलेली वाटचाल अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये उत्सव मंडळातर्फे आयोजित (कै.) अभय देसाई स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा उद्‍घाटन सोहळा झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. सुहास सावंत, अमेय देसाई, विजय देसाई, माजी सरपंच अरविंद शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे, मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, नारायण राऊळ, ॲड. उमा सावंत, परीक्षक शहाबुद्दीन शेख, संजय दळवी, महेश कुडाळकर, सुरेश राऊळ आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे यावर्षी ४९ वे वर्ष आहे. पुढच्या वर्षी या स्पर्धेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल. भजन स्पर्धेमध्ये एवढ्या वर्षांचे सातत्य ठेवणे कठीण आहे; पण कुडाळेश्वर मंडळाने हे सातत्य राखण्यात यश मिळवले आहे. या स्पर्धेमुळे नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे. भजन परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम हे मंडळ करीत आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास सावंत यांनी सांगितले. उदय वेलणकर यांनी सूत्रसंचालन केले.
..........
होणारी भजने अशी
स्पर्धेमध्ये सोमवारी (ता.७) श्री देव भोम भजन मंडळ आंदुर्ले, श्री सातेरी कुडाळेश्वर कुलस्वामिनी भजन मंडळ पावशी, मंगळवारी(ता. ८) श्री देव रवळनाथ भजन मंडळ पिंगुळी, स्वराभिषेक भजन मंडळ तांबुळी, बुधवारी (ता.९) लिंगेश्वर भजन मंडळ गिरगाव, सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ कुसबे, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त, गुरुवारी (ता.१०) श्री लिंगेश्वर भजन मंडळ जानवली-कणकवली, दत्तकृपा प्रसादिक भजन मंडळ वेंगुर्ले, काळंबा प्रासादिक भजन मंडळ डिगस, शुक्रवारी (ता.११) श्री राम कृष्ण हरी सेवा संघ भजन मंडळ पाट, महापुरुष प्रसादिक भजन मंडळ पाट यांची भजने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

SCROLL FOR NEXT