कोकण

प्रशांत दाभोळकर

CD

- ratchl४२.jpg -
P२४N१६१९१
चिपळूण ः प्रशांत दाभोळकर यांचा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळातर्फे सत्कार करताना आमदार शेखर निकम व मान्यवर.

प्रशांत दाभोळकर बनले ‘डबल एसआर’

सह्याद्री रँडोनिअर्स क्लब ; आंतरराष्ट्रीय पातळीवरील किताब

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः सह्याद्री रँडोनिअर्स या ऑडॅक्स क्लब आयोजित पाटण-सातारा-शिरवळ-लोणंद फलटण-नातेपुते-पंढरपूर परत त्याच मार्गावरून ६०० किमी बीआरएम अवघ्या ३४ तास ३५ मिनिटात पूर्ण करून प्रशांत दाभोळकर यांनी सलग दोन वर्ष एसआर बनण्याचा बहुमान पटकावला आहे. एकाच वर्षात २००, ३००, ४००, ६०० किमी बीआरएम पूर्ण केल्यानंतर एसआर (सुपर रँडोनिअर) हा सायकलिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा किताब मिळतो.
पर्यावरण रक्षणासोबत आरोग्य जपण्यासाठी लांब पल्ल्याच्या सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑडॅक्स क्लब पॅरॅशियन (पॅरिस) ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारी संस्था आहे. संस्था संलग्न सदस्य असणाऱ्या ऑडॉक्स क्लब इंडियाकडून संपूर्ण देशात बीआरएम आयोजित करून सायकलिंगला प्रोत्साहन दिले जाते. बीआरएम निर्धारित वेळेत कोणाचीही मदत न घेता पंक्चर अथवा कोणत्याही प्रकारचा सायकलला प्रॉब्लेम झाला तरी स्वतः दुरुस्त करून अनेक अडचणींवर मात करून पुढे जावे लागते. श्रीकांत जोशी, अजित जोशी, हेमंत भोसले यांनी ऑडॉक्स क्लब इंडिया सदस्य असणाऱ्या चिपळूण येथील सह्याद्री रॅंडोनिअर्सकडून आयोजित करण्यात आलेल्या ६०० किलोमीटर बीआरएम पूर्ण केली आहे तसेच एस. आर. डॉ. मनीषा वाघमारे यांनी २००, ३००, ४०० किलोमीटर बीआरएम पूर्ण केल्या होत्या. २८ ते २९ सप्टेंबर या दिवशी ४० तासाच्या निर्धारित वेळेत पाटण-शिरवळ-लोणंद फलटण-नातेपुते ते पंढरपूर आणि पुन्हा याच मार्गाने रिटर्न अशी ६०० किलोमीटरची बीआरएम आयोजित केली होती. दाभोळकर हे चिपळूण सायकलिंग क्लबचे नामांकित स्ट्राँग अल्ट्रासायकलिस्ट रायडर असून, त्यांनी आजवर अनेक सायकलिंग इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपला ठसा उमटवला आहे. टूर दी हंड्रेडसारख्या चॅलेंजमध्ये शंभर दिवसात ६०६० किमी करून भारतभरातील २८५३ स्पर्धकांमध्ये ७४वा नंबर प्राप्त करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब पटकावला. त्यांना मनोज भाटवडेकर, अंकुश जंगम, विक्रांत अलेकर, प्रसाद अलेकर, डॉ. स्वप्नील दाभोळकर, डॉ. तेजनंद गणपते, भारती तारे, नीशा आंबेकर, अहमद शेख, आदींसह चिपळूण सायकलिंग क्लबमधील सदस्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
-----
३७ हजार ५०० किमी सायकलिंग

मागील वर्षी एसआर सीरिज पूर्ण करताना प्रशांत यांनी १ हजार किमीची बीआरएम पाटण ते कागल (कर्नाटक बॉण्ड्री) परत पाटण ते पंढरपूर परत पंढरपूर ते पाटण, पाटण ते सातारा (किकवी) अशा रूटची बीआरएम ७३ तासात पूर्ण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT