17705
महामार्गावरील मोकाट गुरांचा बंदोबस्त करा
धामणी, गोळवली ग्रामस्थांची मागणी; संगमेश्वर पोलिस ठाण्याला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ९ ः महामार्गावरील मोकाट व उनाड गुरांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धामणी आणि गोळवली येथील शेतकऱ्यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मोकाट गुरांमुळे अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मोकाट गुरांमुळे महामार्गावर अपघात घडत आहेत. त्यामध्ये अनेकजण जखमी होत आहेत. मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी पोलिसांना निवेदन दिले होते. त्यामध्येही बाजारपेठेतील तसेच महामार्गावरील मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता धामणी, गोळवली येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मोकाट गुरेमालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.