कोकण

‘इस्कॉन’तर्फे १७ पासून कुडाळात मार्गदर्शन सत्र

CD

‘इस्कॉन’तर्फे १७ पासून
कुडाळात मार्गदर्शन सत्र
कुडाळ ः आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे (इस्कॉन) यशस्वी व आनंदी जीवनासाठीचे मार्गदर्शन सत्र येथील मराठा मंडळ हॉल येथे १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान आयोजित केले आहे. यात कणकवलीतील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. महेश साटम मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या दिवशी ‘सुखाचा शोध’, दुसऱ्या दिवशी ‘देव खरोखरच अस्तित्वात आहे का?’, तिसऱ्या दिवशी ‘मी कोण आहे?’ विषयावर प्रा. साटम मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे दुलाजी सावंत यांनी केले आहे.
------------
पोलिस उपनिरीक्षकपदी
शरद देठेंची नियुक्ती
सावंतवाडी ः येथील पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकपदी शरद देठे यांची नियुक्ती करण्यात आली. देठे यांनी तीन वर्षे कणकवली पोलिस ठाण्यात सेवा केली. त्यानंतर त्यांची सोमवारी (ता. ७) सावंतवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली. यापूर्वी त्यांनी मुंबई येथे सेवा बजावली होती. ते २०१५ च्या गृहविभागाच्या एमपीएस परीक्षेतून उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाले. देठे यांच्या नियुक्तीने आता पोलिस उपनिरीक्षकपदांची संख्या चार झाली आहे. सावंतवाडी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकपद रिक्त असून, हे पद लवकरच भरण्याची गरज आहे.
-------------
परुळेबाजार, मेढा येथे
फळबाग कामांचा प्रारंभ
वेंगुर्ले ः ग्रामपंचायत परुळेबाजार व मेढा ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर सिंचन विहीर, गुराचे गोठे व फळबाग लागवड कामाचे भूमिपूजन गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विस्तार अधिकारी शुभदा कविटकर, शिरसाट, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामसेवक शरद शिंदे, तंटामक्त समिती अध्यक्ष पुरुषोत्तम प्रभू, प्रसाद पाटकर आदी उपस्थित होते. लाभार्थी कृष्णा पाटकर, उमेश नेवाळकर, मोहन वाडेकर, अनुराधा प्रभू यांच्या विहीर कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकरी वर्गासाठी विविध योजनांबाबत कृषी विभागामार्फत माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT