कोकण

काजू अनुदान अटींबाबत पणनमंत्र्यांशी चर्चा

CD

17928
काजू अनुदान अटींबाबत पणनमंत्र्यांशी चर्चा

दीपक केसरकर ः अर्ज करण्याचे बागायतदारांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः काजूला प्रतिकिलो १० रुपये अनुदान मंजूर केले आहे. हे २७९ कोटी रुपयांचे अनुदान घेण्यासाठी अर्ज करावा. जीएसटी अट शिथिल करून गुमास्ता परवाना असलेल्या काजू व्यापाऱ्यांच्या खरेदी पावतीवर अनुदान देण्यासाठी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करावे, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काजू बागायतदारांशी चर्चा करताना सांगितले.
येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज काजू बागायतदार ठिय्या आंदोलनाला बसले होते. त्यांची मंत्री केसरकर यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर, जयप्रकाश चमणकर, संजय देसाई, सुरेश गावडे, दिवाकर म्हाळवणकर, प्रवीण परब, आकाश नरसुले, भीमराव देसाई, विश्वनाथ राऊळ, संजय लाड, विष्णू सावंत, उल्हास देसाई, शांताराम गावडे, प्रदीप सावंत, जगदेव गवस, कृष्णाजी कोठावळे व शेतकरी उपस्थित होते.
काजू बागायतदारांनी, जीएसटी अट शिथिल करून अनुदान वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली होती. सामाईक जमिनीमधील लाभार्थीचे हमीपत्र घेण्याचा निर्णय यापूर्वीच केसरकर यांनी मंजूर करून घेतला आहे. आज त्यांनी जीएसटी अट शिथिल होईल, असे सांगून गुमास्ता परवाना असलेल्या काजू व्यापाऱ्यांच्या खरेदी पावतीवर अनुदान मंजूर केले जाईल, असे मंत्री सत्तार यांनी आश्वासन दिले असून, तसे पत्र मंत्र्यांनी दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT