कोकण

तोंडवळीवासीयांचे प्रश्न मार्गी लावू

CD

17929

तोंडवळीवासीयांचे प्रश्न मार्गी लावू

वैभव नाईक : सुरुबन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ९ : तोंडवळी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येत आहे. तोंडवळी सुरुबन रस्त्यासाठी सरपंच, उपसरपंच यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. या भागाच्या विकासासाठी तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
तोंडवळी सुरुबन रस्ताकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. आमदार नाईक यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. भूमिपूजन प्रसंगी उबाठा शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, समीर लब्दे, तोंडवळी युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर, माजी उपसरपंच संजय केळुसकर, आचराचे माजी सरपंच मंगेश टेमकर, तोंडवळीच्‍या सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण, अनन्या पाटील, नाना पाटील, दीपक कांदळकर, वायंगणीचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, दिलीप पुजारे, महेश चव्हाण, मिलिंद वायंगणकर, दीक्षा गोलतकर, बंटी गोलतकर, अना हडकर, गणेश पाटील, अमित पाटील, सिद्धेश पाटील, स्नेहल पाटील, गीता पाटील, मधुकर पाटील, बाबल नाईक, ज्योती हडकर, प्रमोद पाटील, ओंकार पाटील, आदींसह तोंडवळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होऊ घातली जाणार आहे. गेल्या दोन निवडणुकांत तोंडवळीवासीयांनी मला साथ दिली. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्याचे काम मी केले आहे. तोंडवळी तळाशील भागातील प्रश्न, भूमिगत विद्युत वाहिनी, बंधारा, आदी विविध कामे मार्गी लागली आहेत. यावेळीही ग्रामस्थ माझ्या पाठीशी ठामपणे राहणार, असा मला विश्वास आहे. या भागाच्या विकासासाठी तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. या रस्त्याला निधी दिल्याबाबत ग्रामस्थांनी आमदार नाईक यांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

आजपासून बदलणार 'या' राशींचं नशीब फळफळणार ! नव्या वर्षापर्यंत पैशांची बरसात आणि कामात यश

Pune Crime : मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; कोथरूडमधील सहा आरोपींना अटक

बारावी बोर्ड परीक्षेला आखाती युद्धाचा फटका, CBSEने ७ देशात परीक्षाच केली रद्द

अंबरनाथ पालिकेत मोठे फेरबदल, पंकज पन्हाळे नवे शहर अभियंता; राजेश तडवींकडे उपअभियंता पदाची धुरा

SCROLL FOR NEXT