कोकण

सेंट थॉमसच्या सानवी, अदित्यचे क्रीडा स्पर्धेत यश

CD

20098
20099
---------

सानवी, अदित्यचे
क्रीडा स्पर्धेत यश
रत्नागिरीः शहराजवळील रवींद्र नगर, कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होत यश मिळविले. सानवी पवार हिने सातारा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात २०० मिटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला, तर शंभर मिटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत तिसरा तर ५० मिटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. त्यातील २०० मिटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेसाठी तिची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. तसेच आदित्य सम्राट पाटील याने डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील तिहेरी उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागस्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना क्रीडा शिक्षक अजित यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
-------
वाहतूक कोंडीमुळे
शिरगावचे प्रवासी त्रस्त
रत्नागिरीः शहराजवळील सागरी महामार्गावरील आरे-वारे मार्गावरील शिरगाव येथील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. शनिवार, रविवारी या दोन दिवसांच्या सुट्टीमुळे आरे-वारे, गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी होते. तसेच स्थानिक नागरिकही आरेवारे, गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी जातात. सायंकाळी शहराकडे परत येताना या मार्गावर वाहनांची गर्दी होते. त्यातच मासळीच्या गाड्या मिरकरवाडा जेटीवर धावत असतात. अरुंद रस्त्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास रस्त्याची दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. तसेच दुचाकीस्वार जागा मिळेल तेथून गाडी घालत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. तासनतास कोंडी सुटत नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
-------

कृषी अधिकारीपदी
शिवराम सदाफुले
रत्नागिरीः रत्नागिरी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीपदी कार्यरत असलेलेल अजय शेंडे यांची बदली सातारा येथे झाली. त्यांच्या जागी शिवराम सदाफुले यांची निवड झाली असून त्यांनी पदभारही स्वीकारला आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांची बदली कोल्हापूर येथे झाल्यामुळे हा पदभार काही महिने अजय शेंडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र अजय शेंडे यांची सातारा येथे आत्मा प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. त्यांनीही पदभार स्वीकारला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कृषी अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सदाफुले यांनी रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली आहेत.
------------
डेरवण फाटा येथे हवे
प्रवासी निवारा शेड
साडवली : सावर्डे येथील डेरवण रुग्णालयाकडे जाणार्‍या डेरवण फाटा येथे प्रवासी निवारा शेड बांधण्याची गरज आहे. रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण तसेच नातेवाईक एसटीने प्रवास करत असतात. त्यांना पावसात, उन्हात उभे राहावे लागते. नवीन महामार्ग बांधताना झाडेही तोडल्याने येथील सावली गायब झाली आहे. दिवसभर या ठिकाणी येणार्‍या जाणाऱ्यांची वर्दळ असते. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. या ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभारण्यात यावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून मागणी होत आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Daryabhavani: स्वराज्याच्या इतिहास उलगडणार! शिवरायांच्या जलझुंजाची गाथा नववर्षी प्रदर्शित होणार; तारीख आली समोर

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदीरातील पेड दर्शन बंद करण्याची मागणी

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

SCROLL FOR NEXT