Bengaluru Accident
esakal
झाडाची मोठी फांदी डोक्यावर कोसळल्याने एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत होऊन तो थेट कोमात गेल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.