24390
कणकवलीत मतदान जनजागृती फेरी
नगरपंचायतीचा पुढाकार ः मुख्यधिकारी गौरी पाटील यांचा सहभाग
कणकवली, ता.११ : मतदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी या अनुषंगाने कणकवली नगरपंचायतीच्यावतीने मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील नगरपंचायत कार्यालय येथून निघालेल्या या फेरीमध्ये मुख्यधिकारी गौरी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
नगरपंचायत कार्यालय ते पटकीदेवी मंदिर, तेथून बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौक तेथून राष्ट्रीय महामार्गावरून कणकवली रेल्वे स्टेशन आणि तेथून पुन्हा नगरपंचायत अशी फेरी काढण्यात आली. दरम्यान, मतदान जनजागृती अंतर्गत नगरपंचायतीच्यावतीने पथनाट्य, मतदार सेल्फी पॉइंट, मतदान हस्ताक्षर अभियान आदी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.