लोगो ः मत गंमत
- नागेश पाटील
--
हिशोबाची वहीच हरवली
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना उमेदवारांसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. एकीकडे मतदारांच्या याद्या एकापाठोपाठ एक उमेदवारांकडे येऊ लागल्या आहेत. यादीसोबत अपेक्षांचा आकडा दिला जात आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात याद्याप्रमाणे वाटप करण्याचे नियोजन केल्याने या याद्यांची नोंद एकत्रितपणे एका वहीत केली जात आहे. या वहीची जबाबदारी काही ठराविक पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. यादीप्रमाणे भेटवस्तू मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले असताना संबंधित मतदारांचे समाधान झाले की नाही, याचाही हिशोब त्या वहीमध्ये ठेवला जात आहे; मात्र एका जाहीर सभेच्या गडबडीत ही वही संबंधित पदाधिकारी कार्यक्रमस्थळी घेऊन गेला. त्या वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी वही हातातून फिरवण्यापेक्षा एका पिशवीत टाकून ती मित्राच्याच दुचाकीला लावून ठेवली; मात्र याची संबंधित मित्राला जराही कल्पना नसल्याने त्याने कार्यक्रम संपल्यानंतर घाईगडबडीत मोटारसायकलला असलेली पिशवी बाजूच्या दुचाकीला लावली आणि तेथून तितक्याच घाईने निघून गेला. काही वेळाने हिशोबाची वही मित्राच्या दुचाकीला असल्याचे त्या पदाधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने तितक्याच गडबडीने तेथे पोहोचून गाडी पाहिली तर त्याला पिशवी दिसून आली नाही. त्यामुळे हिशोबाची वही हरवली, अशी बोंब उठली आणि सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अखेर त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यामध्ये पिशवी नेणाऱ्या जवळच्याच एका कार्यकर्त्याची दुचाकी दिसून आली. त्यामुळे त्याच्याशी संपर्क साधून वहीची चौकशी केली. त्याने हिशोबाची कसली तरी वही पिशवीत आहे. येऊन घेऊन जा, असे तो बोलल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याच्या जीवात जीव आला; मात्र त्यानंतर आजतागायत हिशोबाची वही हरवली हे गाणं सुरूच आहे.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.