कोकण

यादीतून नाव वगळल्यास पुन्हा नोंदणी अत्यावश्यक

CD

यादीतून नाव वगळल्यास
पुन्हा नोंदणी अत्यावश्यक
जिल्हाधिकारी पाटील ः मतदारांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः ज्यांची नावे यादीतून डिलिट झाली आहेत, ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्र. १७ भरून आणि आपले मतदान कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. ज्यांची नावे मतदार यादीमध्ये दिसत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील प्रक्रिया करून मतदानाचा हक्क बजावावा, अशा प्रकारचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. मात्र, मतदाराचे यादीमधून नाव वगळल्यास त्याला मतदान करता येत नाही. अशावेळी मतदाराने आपल्या नावाची नव्याने मतदार यादीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदारांनी कोणत्याही चुकीच्या संदेशाला बळी न पडता आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. अनेक दिवसांपासून समाजमाध्यमांवर चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मतदान यादीमधून मतदाराचे नाव वगळल्यास मतदान करता येत नाही. अशावेळी मतदाराने आपल्या नावाची नव्याने मतदार यादीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदविण्यासाठी नामनिर्देशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदाराला संधी असते, त्यानंतर मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येत नाही. त्यामुळे सध्या ज्या मतदाराचे नाव मतदार यादीमधून वगळले आहे, त्यांना २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल होणारा संदेश चुकीचा असून, नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. तसेच असा संदेश इतरांनाही पाठवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT