फोटो फिचर
काजरघाटी धारेवर डंपिंग ग्राऊंड
रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी धार ते काजरघाटी शाळा या दरम्यानचा रस्ता म्हणजे डंपिंग ग्राऊंडच झाले आहे. या रस्त्याशेजारी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, फुकट गेलेल्या गाद्या, कपडे, तुटलेले संडासचे भांडे, बांधकामाचा मलबा, प्लायवूड, फुकट गेलेले लाकूड, बाद झालेल्या ट्युबलाईट, कुसलेला भाजीपाला हे सर्रासपणे नागरिकांकडून टाकले जात आहे. त्यामुळे हा सुमारे ५०० मीटरचा रस्त्याच्याशेजारी आणि शेजारील गटारातही कचरा भरलेला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडूनही दुर्लक्ष होत आहे. शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काजरघाटी धार येथे सीसीटीव्ही लावलेले आहेत; पण हा घाट सुरू झाल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा नाही. त्यामुळे घाट सुरू झाल्यानंतर उतारातील रस्ता आणि गटार कचरा टाकणाऱ्यांसाठीच आहे, असेच दिसून येत आहे. सकाळी या रस्त्यावर फिरायला येणारे नागरिक येताना कचऱ्याच्या पिशव्या येथे आणून टाकतात तसेच बांधकामाची मलबाही गाड्या भरून येथेच टाकला जात आहे. पावसाळ्याच्या कालावधीत उतारामुळे हा सर्व कचरा गावात वाहून जाऊन गावातील गटारे तुंबतात तसेच येथून पुढे हे प्लास्टिक आणि कचरा काजळी नदीत जात आहे. त्यामुळे नदीही प्रदूषित होत आहे. त्याची ही क्षणचित्रे........
-rat१९p२.jpg-
P24N26249
रत्नागिरी ः काजरघाटी धार येथील घाटातील रस्त्यावर विखुरलेला प्लास्टिक कचरा.
-rat१९p३.jpg-
24N26250
काजरघाटी येथील रस्त्याशेजारी टाकण्यात आलेला कचरा.
-rat१९p४.jpg-
24N26251
रस्त्याशेजारी टाकलेला बांधकामाचा मलबा.
-rat१९p५.jpg-
24N26252
घरातील फुकट गेलेल्या शोकेसचे सामान, बाटल्या, दगडही येथे बिनधास्त आणून टाकले जात आहेत.
-rat१९p६.jpg-
२४N२६२०१
फुटलेले संडासचे भांडेही येथे टाकलेले आहे.
-rat१९p७.jpg-
२४N२६२०२
रस्त्याशेजारी वाहनातून आणून टाकलेले दगड, माती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.