कोकण

बसणी सोसायटीचा हीरक महोत्सव उत्साहात

CD

बसणी सोसायटीचा हीरक महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः तालुक्यातील बसणी विकास सेवा सोसायटीचा हीरक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बसणी विकास सेवा सोसायटी ६० वर्षे कार्यरत आहेत. सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या कालावधीत कर्जपुरवठा केला जातो. सोसायटीच्या दिवंगत सभासदांच्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून आर्थिक मदतही केली जाते. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या या हीरक महोत्सवानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा झाली. या वेळी संस्थेचे सभासदांसह ग्रामस्थांनी या पूजेला वर्णी लावली. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष जयवंत कदम, सदस्य दादा तोडणकर, कमिटी सदस्य प्रशांत बंदरकर, अनंत मांडवकर, सुहासिनी बारगोडे यांच्यासह बसणी गावातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी पूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT