शृंगारतळीच्या रिगल कॉलेजमध्ये योग कार्यशाळा
गुहागर, ता. १९ : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये बीबीए विभागांतर्गत योग कार्यशाळा झाली. कार्यशाळेत योग प्रशिक्षक आदिती धनावडे उपस्थित होत्या.
सर्वप्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांनी स्वागत केले. त्यानंतर धनावडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले. विविध आसने प्राणायाम आणि ध्यान या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, वक्रासन, वज्रासन, मंडू कासन, पद्मासन, भद्रासन, पवन मुक्तासन, सायकलींग, भुजंगासन, नौकासन, आणि शवासन यासारख्या आसनांचा समावेश होता.
तसेच मनःशांतीसाठी काही विशेष तंत्र शिकवली. प्रत्येक आसनानंतर प्रशिक्षकांनी त्याचे फायदे, योग्य पद्धत आणि आसन करताना घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी ताणतणाव कसा कमी करावा, एकाग्रता कशी वाढवावी आणि नियमित योगाभ्यासाने सकारात्मक जीवनशैली कशी स्वीकारावी, हेही समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन योगासनांचा सराव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.