कोकण

मालवण सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

CD

26343

मालवण सातेरी मंदिरामध्ये
त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : शहरातील देऊळवाडा येथील मालवणचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री देव रामेश्वर व नारायण यांची पालखी मिरवणूक व सुमारे २० किलो लोकरीच्या फुलांची माळ, दोन हजार पणत्यांची आरास करण्यात आली.
आई सातेरी नावाची पूर्णपणे लोकरीची बनविलेली स्वागत कमान विशेष आकर्षण ठरली. सध्या प्लास्टिक फुले व इतर साधनांद्वारे आरास करण्याकडे कल असताना देऊळवाडा सातेरी मंदिर येथील युवाईने पर्यावरणाचा संदेश देत केलेली लोकरीची फूल माळ व आई सातेरी नावाची स्वागत कमान आकर्षक लक्षवेधी ठरली. उत्सवानिमित्त परिसरातील युवतींनी गेले महिनाभर मेहनत घेत सुमारे २० किलो लोकरीच्या ८० रंगीत फुलमाळा बनवल्या होत्या. यात २० ते २५ तरुणी सहभागी झाल्या. यासाठी आई सातेरी बालगोपाळ मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. दोन हजार पणत्यांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या पालखी सोहळ्यासाठी स्वागत रांगोळी, तसेच आकर्षक विविध संदेश देणारी रांगोळी काढण्यात आली. ग्रामदेवतांच्या पालखी प्रदक्षिणेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT