कोकण

जामसंडे येथे उद्यापासून तालुकास्तर विज्ञान प्रदर्शन

CD

जामसंडे येथे उद्यापासून
तालुकास्तर विज्ञान प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः येथील पंचायत समिती शिक्षण विभाग आणि जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवारी (ता.२६) ते बुधवार (ता.२४) या कालावधीत सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आयोजित केले आहे.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा आहे. या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थी तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर विज्ञान प्रतिकृती मांडणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात मंगळवारी प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत. बुधवारी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर प्रतिकृती यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण होणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घ्यावा. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विज्ञानप्रेमींनी विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे, मुख्याध्यापक संजय गोगटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

वाहन मालकांसाठी मोठी बातमी! गाडी ट्रान्सफर आणि NOC चे नियम बदलले; RTOच्या फेऱ्या टाळायच्या असतील तर 'हे' काम लगेच करा

Eid-e-Milad 2026: ईद-ए-मिलादनिमित्त 26 ऑगस्टला बँका बंद की सुरू? महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये काय स्थिती? पाहा

Marathi News Live Updates : रायफल-शूटिंग प्रशिक्षक शेख सादिक खान याला अटक

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT