जिल्हा परिषदेकडून
दूषित पाणी तपासणी
रत्नागिरीः जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेल्या पाणी नमुने तपासणीमध्ये जिल्ह्यातील २.२६ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाणी शुद्धीकरणाच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून ग्रामपंचायतींना दिली आहे. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार पसरतात त्यामुळे साथीच्या आजारांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाणी गाळून, शुद्ध करुन तसेच गरम करुन प्यावे अशी जनजागृती गावोगावी करण्यात येते तसेच पाणी शुद्धीकरणासाठी तुरटी, मॅडिक्लोरचा वापर करण्यात येतो. दर महिन्यात असा अहवाल तयार केला जातो. यासाठी सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी केली जाते. मागील महिन्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये जिल्हाभरातून पाण्याचे १. ३७० नमुने गोळा केले होते. त्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. त्याचा अहवाल पाणी व स्वच्छाता विभागाला प्राप्त झाला असून पाण्याचे ३१ नमुने म्हणजेच २.२६ टक्के पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दूषित पाण्याची आकडेवारी पाहता इतर जिल्ह्यांपेक्षा फार कमी आहे. आणि या दूषित पाण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांची तपासणी पाणी व स्वच्छता विभागाकडून करण्यात येणार आहे.
-------
फलोत्पादन विकासासाठी
२४ लाखाचे अनुदान
रत्नागिरी ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता २४ लाख ७३ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटीक, क्षेत्र विस्तार घटकांतर्गत ड्रॅगन फ्रुट, पुष्पोपादन, फळपिके, मसाला पिके, अळंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती ग्रीन हाऊस, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, फलोत्पादन यांत्रिकीकरण मनुष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीनंतर व्यवस्थापन (पॅक हाऊस प्रक्रिया युनिट, रायपनिंग चेंबर) आणि पणन सुविधा या विविध बाबींचा समावेश आहे. यावर्षी यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी तरतूद करण्यात आली आहे. या योजने सहभागी हेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजीकच्या आपले सरकार ई सेवा केंद्रात जाऊन किंवा https: mahadbtmahait.govin या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.