कोकण

अभ्यंकर महाविद्यालयात संविधान दिन

CD

अभ्यंकर महाविद्यालयात
संविधान दिन

रत्नागिरी ः अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम झाला. या वेळी उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर प्रमुख उपस्थित होते. दिनविशेष समितीच्या प्रमुख विस्मया कुलकर्णी यांनी देशाच्या एकूण प्रगतीत संविधानाचे असलेले महत्व स्पष्ट केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही मुल्यांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती दिली. उपप्राचार्य प्रा. गोसावी यांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती करून घ्यावी, असे आवाहन केले. उत्तम नागरिक होण्यासाठी एक नागरिक म्हणून हक्क आणि कर्तव्य या दोन्हीं विषयी योग्य जाण निर्माण करण्याचेही आवाहन केले. सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकट वाचन केले. मनस्वी लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले.
---
‘भाजप पक्षवाढीसाठी
प्रयत्न करणार’

रत्नागिरी ः दक्षिण रत्नागिरीत भाजप संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार, असे दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त जिल्हा सचिव संदीप सुर्वे यांनी सांगितले. माझ्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते संदीप सुर्वे यांनी आभार मानले. सुर्वे हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. १० मधील बूथप्रमुख, २०११ मध्ये भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये भाजपा रत्नागिरी शहर सरचिटणीस म्हणून काम करत होते. तसेच मागील ५ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्यातून एका रविवारी सादर होणाऱ्या मन की बात या उपक्रमाचे जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
---
उद्योजकता विकास
कार्यक्रम रत्नागिरीत

रत्नागिरी ः भारतीय उद्योजकता विकास संस्थेतर्फे अनुसूचित जाती-जमाती महिलांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याकरिता महिला उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात आला. यासाठी टाटा कम्युनिकेशन्स मुंबईचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणामध्ये ३३ महिलांनी सहभाग घेतला. समारोप कार्यक्रमाला श्रीमती सोपपात्रे, आस्था दिव्यांग संस्था रत्नागिरी अॅड. हेमांगी पालकर, खानविलकर, उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय परूळेकर उपस्थित होते. अठरा दिवसीय कार्यक्रमात महिलांना त्यांची मानसिकता आणि उद्योजकतेचे संस्कार होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये उद्योजक म्हणजे काय, उद्योजकीय व्यक्तीमत्व, संभाषण कौशल्य, प्रकल्प अहवाल, व्यवसाय मार्गदर्शन, विविध शासकीय योजना, खादी ग्रामोद्योग योजना, डीआयसीच्या योजना, सिंधू रत्नयोजना, संवाद कौशल्य, शासनाचे पतधोरण, विपणन व्यवस्थापन, सूक्ष्म व लघु उद्योगातील कर आणि कायदे, उद्योग कारखाने यांचे कामकाज समजून घेण्यासाठी फॅक्टरी व्हिजिट, मार्केट सर्वे, उत्पादन ओळख आणि उत्पादन निवड प्रक्रिया अधिवेशनावर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
-----

गोगटे महाविद्यालयात
लिपी परिचय वर्ग

रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे प्राचीन भारतीय लिपींचा परिचय वर्गाचे आयोजन केले आहे. यात सर्व विद्याशाखांचे आणि विषयांचे विद्यार्थी आणि जिज्ञासू नागरिकही सहभागी होऊ शकतील. हा वर्ग ३ ते ५ डिसेंबरदरम्यान, सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत गोगटे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. ब्राह्मी ही सर्वात प्राचीन भारतीय लिपी आहे. अनेक अभिलेख ब्राह्मी लिपीमध्ये आढळून येतात. ग्रंथलिपी ही दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. अनेक संस्कृत हस्तलिखिते ग्रंथ लिपीमध्ये आढळून येतात. या वर्गामध्ये ब्राह्मी लिपी आणि ग्रंथलिपीचा परिचय होणार आहे. यामध्ये पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये कोषशास्त्र विभागात सहसंपादक म्हणून दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या व सध्या उदयपूरच्या धरोहर संस्थेत कार्यरत असणाऱ्या, संस्कृत, कोषशास्त्र, हस्तलिखितशास्त्र, स्थापत्यशास्त्र यामध्ये संशोधनात्मक कार्य करणाऱ्या डॉ. विनया क्षीरसागर या वर्गामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणीसाठी प्रा. स्नेहा शिवलकर आणि प्रा. प्रज्ञा भट यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

Pune: रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; सहा फलाटांच्या कामाला सुरुवात ; नवीन ६० गाड्या धावणार

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदी आजपासून पुन्हा लागू; जलसंपदा विभागाचा निर्णय

SARTHI Scheme : UPSC मध्ये 140 तर MPSC मध्ये 1200 विद्यार्थी यशस्वी; 'सारथी' संस्थेने मराठा तरुणांचे स्वप्न कसे केले साकार? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

बॉलिवूड गाजवलं, हॉलिवूडमध्येही नाव कमावलं; तरीही प्रियांका म्हणाली, '...ही खंत कायम आहे'

SCROLL FOR NEXT