कोकण

मानसिक ताणाकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

CD

- rat३p११.jpg-
२४N२९०२९
रत्नागिरी ः कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थिनी.

मानसिक ताण, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

श्वेता चव्हाण ः हेगशेट्ये महाविद्यालयात महिला विकास कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः मानसिक ताण हा वेगवेगळ्या प्रकारचा असून, तो सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. काहीजण केवळ सहन करत राहतात; पण बोलत नाहीत म्हणूनच त्या ताणाचा मनाबरोबरच शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे बोला, व्यक्त व्हा आणि योग्य तो सल्ला घ्या, असे सामाजिक कार्यकर्त्या श्वेता चव्हाण यांनी सांगितले.
येथील नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्यावतीने विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन आणि किशोरावस्था-तारुण्यावस्थेतील आरोग्य, घ्यावयाची काळजी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक प्राची जाधव-भोसले, स्टाफ नर्स समीक्षा दैत्य, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. सुलोचना कुमारी उपस्थित होत्या. या प्रसंगी चव्हाण यांनी मानसिक तणावासाठी अॅक्टिव्हिटी घेतली. स्टाफ नर्स दैत्य यांनी मुलींची किशोरावस्थेकडून प्रौढावस्थेकडची वाटचाल सांगताना मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीचे चक्र, नियमित आणि अनियमित मासिक पाळीची लक्षणे, मासिक पाळीमध्ये शारीरिक, मानसिक बदल, लक्षणे, या दरम्याने घ्यायची काळजी या विषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. समुपदेशक प्रवीण भोयर, ऋत्विक मयेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
---
गैर प्रकाराबाबत आवाज उठवा

‘वयात येताना हितगुज उमलत्या कळ्यांशी'' यावर संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्राची जाधव-भोसले यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगून भोसले यांनी आज तारुण्यावस्थेत पदार्पण करताना वयाच्या त्या नाजूक टप्प्यावर मुलांविषयी आकर्षण निर्माण होते ते चुकीचे नाही; मात्र कोणत्याही परिस्थिती चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका, आपल्यावर अत्याचार होतोय असे वाटल्यास लागलीच त्यावर आवाज उठवा. आपल्या करिअरला प्राधान्य द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT