Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

700-Gram Weight Difference Denies Final Spot : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुचिका तारियालने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावले.
Asian Games MMA

Asian Games MMA

esakal

Updated on

नागोया : भारताच्या सुचिका तारियाल हिने आशियाई क्रीडा स्पर्धेमधील मिक्स्ड मार्शल आर्ट्‌स या खेळामध्ये ब्राँझपदक पटकावत इतिहास रचला, मात्र प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवातील तिचे सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचण्याचे स्वप्न अवघ्या ७०० ग्रॅमने हुकले.

सुचिका तारियाल व सिंगापूरची खेळाडू ह्यूई हून टिओ हिच्यामधील लढत बरोबरीत राहिल्यानंतर नियमानुसार सकाळी केलेल्या वजनावरून निकाल लावण्यात आला. सिंगापूरच्या खेळाडूचे वजन सुचिका तारियालच्या वजनापेक्षा ७०० ग्रॅम कमी असल्यामुळे तिला विजयी घोषित करण्यात आले. यामुळे ह्यूई हून टिओ हिने अंतिम फेरीत प्रवेश केला. सुचिका तारियाल हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

सुचिका तारियाल-ह्यूई हून टिओ यांच्यामधील लढत चुरशीची झाली. पूर्वार्धात सिंगापूरच्या खेळाडूने वर्चस्व राखले, मात्र उत्तरार्धात भारतीय खेळाडूकडून झोकात पुनरागमन करण्यात आले. दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. एक मिनिटाची जादा फेरीही खेळवण्यात आली.

Asian Games MMA
Akola Water Crises : दहा दिवसांनी नळ, रोजचे जगणे बेहाल, अकोलेकरांना विकत पाण्याचा आधार ; अकोट फाईल, गवळीपुरा, नायगाव परिसरातील नागरिक त्रस्त

अंतिम शिटी वाजवण्यात आल्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सुरुवातीला सिंगापूरच्या खेळाडूच्या बाजूने निकाल लावण्यात आला, मात्र भारतीय पथकाकडून निर्णयाला आव्हान देण्यात आल्यानंतर ही लढत ड्रॉ अर्थातच बरोबरीत ठेवण्यात आली, मात्र मिक्स्ड मार्शल आर्ट्‌स या खेळाच्या नियमानुसार दोन खेळाडूंमध्ये बरोबरी झाल्यास ज्या खेळाडूचे वजन कमी असते, त्या खेळाडूला विजयी घोषित करण्यात येते.

सोमवारी पहाटे झालेल्या वजनामध्ये सिंगापूरच्या खेळाडूचे वजन हे भारतीय खेळाडूपेक्षा ७०० ग्रॅम कमी होते. त्यामुळे तिला विजयी घोषित करण्यात आले.

Asian Games MMA
Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

संस्मरणीय पदक

देशाला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌स या खेळमध्ये पहिले पदक जिंकून इतिहास रचणारी सुचिका तारियाल या वेळी म्हणाली की, हे पदक माझ्यासाठी आयुष्यापेक्षाही मोलाचे आहे.’’

हरियानातील कन्येचे अष्टपैलुत्व

हरियानातील रोहतक जिल्ह्यातील किलोई गावची रहिवासी असलेल्या सुचिकाने सामन्यानंतर बोलताना सांगितले की,‘‘मी यापूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (२०२२) ज्युडो खेळले होते, जिथे ब्राँझपदकाचा सामना जिंकण्याची संधी हुकली होती. त्यामुळे मला माझ्या देशासाठी पदक जिंकायचे होते, जेणेकरून लोक मला ओळखू शकतील. मी ‘जिऊ-जित्सू’मध्येही विश्वविजेती आहे. तसेच मी ‘कुराश’ प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतही भाग घेतला होता, पण तिथे मला पदक मिळवता आले नाही. त्यानंतर मला येथे प्रतिनिधित्व करण्याची दुसरी संधी मिळाली आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com