कोकण

चिकित्सक समुहाचा ‘पूर्णब्रह्म’ स्तुत्य

CD

29053

चिकित्सक समूहाचा ‘पूर्णब्रह्म’ स्तुत्य

भूषण दुगाडे ः पिंगुळीत चौथ्या पर्वाचे थाटात उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः ‘‘हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासासह श्रम महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत नवनवीन स्पर्धांमधून शिकता यावे, यासाठी चिकित्सक समूहाचे पाटकर-वर्दे कॉलेज गेली चार वर्षे पूर्णब्रह्म बॅनरखाली राबवित असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे,’’ असे प्रतिपादन नमो वॉटरफ्रंट, गोवा हॉटेलचे मुख्य शेफ भूषण दुगाडे यांनी आज ‘पूर्णब्रह्म’च्या उद्‍घाटनप्रसंगी केले.
चिकित्सक समूहाच्या पाटकर-वर्दे कॉलेज, सॅटेलाइट सेंटर पिंगुळीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पूर्णब्रह्म-पर्व चौथे’चे आयोजन ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत केले आहे. आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवात विविध आंतरराज्य स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटक येथील १५ महाविद्यालयांचा सहभाग आहे. ‘पूर्णब्रह्म-पर्व चौथे’चे उद्‍घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी सेंटरचे हेड ऑफ डिपार्टमेंट विवेकानंद शेट्टी, कॉलेजचे मुख्य शेफ डॉ. अमोल राऊळ, मुख्य शेफ व परीक्षक ए. एफ. अफसर, मुंबई कॉलेजचे समन्वयक नोएल फर्नांडिस, रोशन मोहंती, क्युरी फर्नांडिस, भावेश म्हापणकर, मारिया डिसोझा, दत्तप्रसाद पवार, शेफ शशांक आमरे, प्रसन्न लाड आदी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. दुगाडे म्हणाले, ‘‘हॉटेल व्यवसायात वाटचाल करताना त्या क्षेत्राची आवड महत्त्वाची आहे. या क्षेत्रात उत्स्फूर्तपणे उतरणे आवश्‍यक आहे. पाटकर-वर्दे कॉलेजच्या माध्यमातून गेली चार वर्षे हा उपक्रम राबविला जातो, हे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने चांगले आहे. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते. इच्छा प्रबळ असली तर यश सहज शक्य आहे. अशा पूर्णब्रह्म महोत्सवात महाराष्ट्र, गोव्यासह १५ कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले. ही निश्चितच हॉटेल व्यवसायाला चांगली दिशा देणारी बाब आहे.’’
श्री. अफसर म्हणाले, ‘‘आजचे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धांमध्ये वाटचाल करण्यासाठी येणारी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर ती आपली पूर्णत्वास नेणे महत्त्वाचे आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरात हॉटेल व्यवसायाशी निगडित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून दिला जातो. कोकणात चिकित्सक समूहाचे पाटकर-वर्दे कॉलेज हा उपक्रम गेली चार वर्षे विद्यार्थ्यांसाठी राबवत असून, ही निश्चितच प्रेरणा देणारी बाब आहे.’’
.............
विविध स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
‘पूर्णब्रह्म’च्या आजच्या पहिल्या दिवशी कप केक कॅनव्हास, शेक इट टू मेक इट, खाद्यरांगोळी, शोर साईड शेफ, मेनू डिझायनिंग, टॉवेल आर्ट चॅम्प, फेस पेंटिंग, फोटोग्राफी या स्पर्धा झाल्या. उद्या (ता. ४) फ्लॉवर सेटिंग, नॅपकिन फोल्ड, केक बॉस, क्विझ, सर्व्हिस स्प्रिंट, फ्लेमलेस कुकिंग, रील मेकिंग या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी (५) निबंध स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ, फ्लेमलेस कुकिंग, स्पोर्ट रिले, रील मेकिंग, एकपात्री अभिनय, प्लेट पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विविध बक्षिसांसह उत्कृष्ट कॉलेज, लक्षवेधी कॉलेजचाही गौरव करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT