कोकण

-साटवलीतील ऐतिहासिक गढी दिव्यांनी उजळली

CD

-rat३p३४.jpg-
२४N२९११२
लांजा ः दिव्यांनी उजळलेली साटवली येथील गढी.
----------

साटवलीतील गढी दिव्यांनी उजळली

देवदिवाळीचे औचित्य ; गांगोवाडी तरुणांचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः देवदिवाळीचे औचित्य साधून गांगोवाडी येथील तरुणांनी एकत्र येऊन रात्रीच्यावेळी हजारो दिवे पेटवून ते साटवली येथील ऐतिहासिक गढीवर ठेवले. या दिव्यांच्या प्रकाशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साटवली गढी उजळून निघाली.
छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्यादृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलेले साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढीकडे पुरातत्त्व विभागाचे आणि स्थानिकांचे दुर्लक्ष झाल्याने सद्यःस्थितीत ही गढी अखेरची घटका मोजत आहे; मात्र दुर्गवीर प्रतिष्ठान, शिवगंध प्रतिष्ठान, लांजा व साटवली गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने साटवली किल्ला संवर्धनाच्यादृष्टीने स्वच्छतामोहीम राबवण्यात येते. शिवप्रेमाने प्रेरित होत साटवली गांगोवाडीतील तरुणांनी देवदिवाळीच्या निमित्ताने ही गढी हजारो दिव्यांनी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला. गांगोवाडीतील तरुण प्रसाद तरळ, प्रकाश कातकर, सौरभ कांबळे, लक्ष्मण तरळ, नितीन तरळ, सखाराम बापेरकर, शिवाजी तरळ, सचिन तरळ यांनी हजारो दिव्यांची आरास गढीवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT