कोकण

तालुकास्तर स्पर्धा

CD

शुक्रवारी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा
चिपळूण बौद्धजन हितसंरक्षक समितीतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण , ता. ३ ः चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती आणि संस्थेच्या शिक्षण समितीच्यावतीने ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात सकाळी ११ वा. होणार आहे.
संस्थेच्यावतीने तीन वर्षांपासून तालुकास्तरीय डॉ. आंबेडकर वक्तृत्व स्पर्धा महापरिनिर्वाणदिनी घेतली जाते. त्यानुसार यावर्षी ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन गटासाठी घेतली जाणार आहे. तीनही गटांकरिता रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र अशा प्रकारचे पारितोषिक देण्यात येणार आहे. प्राथमिक गटाकरिता (पाचवी ते सातवी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाज परिवर्तनात डॉ. बाबासाहेबांची भूमिका आणि कार्य हे दोन विषय असून, वेळ पाच मिनिटांची ठेवण्यात आली आहे. माध्यमिक गटासाठी (आठवी ते दहावी) राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचे योगदान तथा राष्ट्रप्रेमी बाबासाहेब, सामाजिक व आर्थिक, लोकशाही कधी प्रस्थापित होईल हे विषय ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी वेळ सहा मिनिटे असतील. महाविद्यालयीन गटासाठी (अकरावी ते पदवी पदविका) आरक्षण धोरण आणि डॉ. बाबासाहेबांची भूमिका, खरेच संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे काय? हे विषय ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी सात मिनिटांची वेळ दिली आहे. शाळा तथा महाविद्यालयांमधून प्रत्येक गटातून जास्तीत जास्त दोनच विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या स्पर्धेबाबत सर्वाधिकार संयोजकांकडे असणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT