टीपः swt330.jpg मध्ये फोटो आहे.
शिरोडा : येथे डॉक्टरांच्या कार्यशाळेत डॉ. जी. टी. राणे यांचे डॉ. राजेश्वर उबाळे यांनी स्वागत केले.
तरुणांमध्ये हृदयरोगाच्या प्रमाणात वाढ
डॉ. जी. टी. राणे : मानसिक असंतुलन राखल्यास नियंत्रण शक्य
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ : वाढती व्यसनाधीनता, फास्ट फूड, व्यायामाचा अभाव, मानसिक असंतुलन यामुळे दिवसेंदिवस तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण आणल्यास अतिरिक्त रक्तदाब औषध न घेता कमी होऊ शकतो, असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जी. टी. राणे यांनी शिरोडा येथील कार्यशाळेत केले.
शिरोडा व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनतर्फे शिरोडा येथील हॉटेल हिलरॉक येथे डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लिलके, डॉ. ज्ञानेश्वर शिवचरण, डॉ. संजीव लिगवत, डॉ. प्रसाद साळगांवकर, डॉ. किरण नाडर, डॉ. के. जी. केळकर, डॉ. अमेय प्रभूखानोलकर, डॉ. सुदिश सावंत, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. रायाजी सातोसकर, डॉ. डी. पी. गावडे, डॉ. गंधाली गावडे, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. सुरेखा काळे, डॉ. जाई पेडणेकर, डॉ. मेघःश्याम रेडकर, डॉ. संगीता मुळे, डॉ. रिना उबाळे, डॉ. सुबोध माधव, डॉ. राखी माधव, डॉ. सई राणे, डॉ. महेंद्र सावंत, आदी उपस्थित होते. डॉ. राणे यांनी जागतिक स्तरावरील अतिरिक्त रक्तदाबाबाबत नवीन सूचना यावर विवेचन करून उपस्थित डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गतर्फे आयोजित डॉक्टरांच्या क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या डॉ. सई लिंगवत, डॉ. सोनाली सावंत, डॉ. दीपाली पालयेकर, डॉ. प्रणाली सावंत, डॉ. हर्षाली गावडे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मणचेकर, स्वागत डॉ. उबाळे, तर आभार डॉ. लिंगवत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.