कोकण

गावखडीच्या आशिष हळदवणेकरची सैन्यदलात निवड

CD

-rat७p६.jpg -
P२४N३००९४
राजापूर ः आई-वडिलांसमवेत आशिष हळदवणेकर.
----------

गावखडीच्या आशिषची सैन्यदलात निवड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः रत्नागिरी येथील गावखडी गावचा सुपुत्र आशिष हळदवणेकर याची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाली आहे. बेळगाव येथे खडतर प्रशिक्षण करून आशिष ‘मराठा लाईट इन्फ्रंट्री रेजिमेंट’मध्ये नुकताच रूजू झाला आहे. त्या द्वारे निश्‍चित केलेल्या ध्येयाला खडतर मेहनतीची जोड देत सैन्यदलाच्या माध्यमातून भारतभूमीची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. लष्करामध्ये भरती झाल्याबद्दल ढोलताशाच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा करत गावखडी ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले.
रत्नागिरी गावखडी येथील आशिष हळदवणेकर याचे शालेय शिक्षण गावातील शाळेत झाले तर, उच्च माध्यमिक शिक्षण पावस येथील स्वामी स्वरूपानंद माध्यमिक विद्यालयात झाले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज अ‍ॅकॅडमीमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने भारतभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने सैन्यामध्ये भरती होण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्याने सैन्यभरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी खडतर मेहनत घेतली. त्याची मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये निवड होत भारतीय सैन्यामध्ये रूजू होण्याचे स्वप्न साकार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

"आई आगीत होरपळलेली आणि मला लीड रोल मिळाल्याचा फोन आला" शुभविवाह फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Dhule Bus Stand : धुळ्यातील एसटी प्रवासाचा कायापालट! चार स्थानकांचा 'एअरपोर्ट' सारखा विकास, ९० नवीन बसेस दाखल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

SCROLL FOR NEXT