राष्ट्रीय सर्वेक्षणांतर्गत
१२ शाळांत चाचणी
संगमेश्वर ः राष्ट्रीय सर्वेक्षणांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील तिसरीसाठी २ शाळा, सहावीसाठी २ शाळा, नववीसाठी १ अशा १२ शाळांमध्ये यादृच्छिक पद्धतीने मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. नवीन अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती, गणिती मूलभूत क्रिया, विज्ञान, भाषा यांचे परिपूर्ण ज्ञान अवगत व्हावे तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चाचण्या व निकाल हे भयावह स्वप्न वाटू नये या उद्देशाने ही चाचणी घेण्यात आली. शिक्षणाला चालना देण्यासाठी व संवर्धित करण्यासाठी मूल्यांकन आणि मूल्यमापन आवश्यक असल्याने या सर्वेक्षणांतर्गत यादृच्छिक पद्धतीने शाळांचे मूल्यमापन घेण्यात आले. यासाठी संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी प्रदीप पाटील यांनी शाळांची निवड केली होती. या चाचणीचा लवकरच निकाल प्राप्त होणार आहे. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी शशिकांत त्रिभवणे, तानाजी नाईक, सरोज आखाडे, समीर काब्दुले यांनी शाळा भेटी देऊन या चाचणीची पाहणी केली.
पशुगणनेचा प्रारंभ
रत्नागिरी : जिल्ह्यात २१ वी पशुगणना २८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. संपूर्ण तालुक्यात एकाचवेळी पशुगणना केली जाणार आहे. ही मोहीम जवळपास तीन महिने राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन माहिती घेणार आहेत. पशुसंवर्धन विभागाची ध्येयधोरणे निश्चित करून विभागामार्फत विविध योजना राबवण्याकरिता पशुगणना कामी येणार असल्यामुळे सर्व नागरिकांनी व पशुपालकांनी प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी चेतन शेळके, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे. २१ वी पशुगणना करण्याकरिता शासनाच्या मागदर्शक सूचनानुसार ग्रामीण भागात ३ हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि पाच प्रगणकामागे एक पर्यवेक्षक तसेच शहरी भागात ४ हजार कुटुंबामागे एक प्रगणक आणि १० प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी २८ प्रगणक व ४ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दूध, अंडी, मांस आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीविकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते. त्यामध्ये पशुधनाच्या १६ प्रजातींचा म्हणजेच पाळीव प्राणी, कुक्कुटपालन, भटक्या प्राण्यांची पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेकरिता प्रगणकांनी स्वतःचा मोबाईल अॅप वापरून माहिती संकलित करावी लागणार आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.