swt1113.jpg
30942
श्री दत्त मूर्ती
''औदुंबर'' ट्रस्टतर्फे आजपासून
नाधवडेत दत्तजन्म सोहळा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ : औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठाण), त्रिमूर्ती मित्रमंडळ आणि दत्त माऊली महिला मंडळ, मुंबईच्यावतीने नाधवडे येथे उद्यापासून (ता. १२) श्री दत्त जन्म सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त १५ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
उद्या (ता. १२) सकाळी ७ वाजता वैदिक कार्यक्रम, रात्री ८ वाजता संगीत भजन, रात्री ९ वाजता नाद (भोळेवाडी) येथील महिलांचे समई नृत्य, शुक्रवारी (ता. १३) सकाळी ८ वाजता दत्तमाऊली पालखीचे मंदिरात आगमन, १० वाजता वैदिक कार्यक्रम, अभिषेक, रात्री ८ वाजता दिनदर्शिका प्रकाशन व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार, ९ वाजता गावातील शालेय मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम, शनिवारी (ता. १४) सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत श्री दत्त याग, दुपारी २ वाजता पालखी मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म सोहळा, रात्री ८ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता ''सुरेल भावगीतांचा कार्यक्रम'', रविवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता श्रींची महापूजा, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता वारकरी भजन होणार आहे. उत्सव कालावधीत रोज सकाळी ५.३० वाजता काकड आरती, दुपारी १ वाजता व सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.