-rat११p२८.jpg-
P२४N३०९१२
लांजा ः लांजा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना एनडीआरएफचे जवान.
----------
लांजा हायस्कूलमध्ये आपत्कालीन प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः लांजा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) अर्थात आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन सुरक्षिततेबाबत प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण दिले.
शालेय आपत्ती प्रशिक्षण व निवारण एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी तहसीलदार प्रियांका ढोले, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, संचालक महंमद रखांगी, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, केंद्रप्रमुख चंद्रकांत पावसकर आदी उपस्थित होते. कोकण प्रदेश दऱ्याखोऱ्यांचा, किनारपट्टीचा आहे. कोकण भागात नैसर्गिक आपत्ती जास्त नसली तरीही येथील युवकांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण काळाची गरज असल्याने केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सदस्य शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.