कोकण

आधारस्तंभ !

CD

लोगो...दीपस्तंभ

गावातील एखादे मंदिर असो अथवा अन्य पुरातन वास्तू, यांचे स्तंभ म्हणजे सौंदर्याने चहूबाजूंनी अलंकृत असल्याने त्यांचे सौंदर्य पाहात राहावे असेच असते. प्राचीन मंदिराचे दगडी स्तंभ उभारणारे आणि त्यावर कोरीव काम करणारे कलाकार महानच असले पाहिजेत. अशा मंदिरांचे स्तंभ हेच शिल्पकलेचे खरे वैभव ठरते.
- rat१३p५.jpg-
24N31308
- जे. डी. पराडकर, संगमेश्वर

---
आधारस्तंभ !
कोकणात अक्षय्यतृतीयेला परसदारी काकडी, पडवळ, दोडका अशा पावसाळ्यात घरोघरी हमखास घेतल्या जाणाऱ्या भाजीच्या बिया घातल्या जातात. हे मुहुर्ताचे वेल पाऊस सुरू होताना मांडवावर विराजमान होण्यास तयार होतात. या मांडवासाठी वेलांसह नंतर मुबलक प्रमाणात लागणाऱ्या भाजीचा भार पेलण्यासाठी मजबूत आधारस्तंभ लागतात. या आधारस्तंभावरच या मांडवाची धुरा अवलंबून असते. स्तंभाचे मुख्य काम आधार देणे हाच असल्याने त्यांना आधारस्तंभ असे म्हटले जाते. सर्व भार आपल्या शिरावर उचलणारे स्तंभ म्हणजे मजबुतीचे प्रतीक समजले जातात. कोणत्याही वातावरणाला न डगमगता तोंड देत उभं राहून विश्‍वास ढळू न देण्याची शिकवण देणारे स्तंभ नव्या उमेदीने जगण्याची कला शिकवतात. सरळ आकाराचे स्तंभ न वाकण्याची आणि न मोडण्याची हमी घेऊन सेवेत रूजू झालेले असतात. ऊन, वारा, वादळ आणि पाऊस यामध्ये मजबुतीने टिकून राहणे एवढेच या स्तंभाना माहित असल्याने खऱ्या अर्थाने ते आधारस्तंभ ठरतात.
स्तंभाची गरज प्रत्येक व्यक्तीला भासते. घर बांधणी असो अथवा घरापुढील मंडप, प्रत्येकवेळी पहिली गरज भासते ती स्तंभांचीच. स्तंभाला बोलीभाषेत खांब, पोल, मेढ, डांब अशा अनेक नावांनी ओळखले जाते. याची नावे वेगवेगळी असली तरी स्थिर उभं राहून सेवा देणं, हा उद्देश कायम असतो. घरापुढे उभारल्या जाणाऱ्या मंडपाचे स्तंभ वर्षानुवर्षे सेवा देत असतात. सम्राट अशोक याने विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येकवेळी एक स्तंभ उभारण्यास सुरवात केली. हे स्तंभ विजयाच्या नोंदीसह अलंकृत केलेले असल्याने त्यांना वेगळी ओळख प्राप्त होऊन त्यांचे महत्व वाढू लागले, ते आजही कायम आहे. त्यातील ‘सिंह स्तंभ शीर्ष’ एवढे अर्थपूर्ण आहे की, ती आपल्या देशाची राजमुद्रा बनली. सारनाथचे हे सिंह स्तंभशीर्ष अर्थपूर्ण असल्यानेच कदाचित राजमुद्रेसह आपल्या देशाच्या चलनावर हे छापण्यात आलेय. या स्तंभावर चार सिंह पाठीला पाठ लावून बसले आहे. सिंह हे शक्तीचे प्रतीक समजले जाते.
समुद्रातील जहाजांना अचूक दिशादर्शनाचे काम करणारे दीपस्तंभ ही एक अफाट कल्पनाशक्तीची किमया आहे. दिशादर्शनासाठी सुरवातीला लाकडं पेटवून ठेवली जात असत; मात्र यामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ लागल्याने या पद्धतीत बदल होत दीपस्तंभांचा जन्म झाला. प्रत्येक बंदरावर शेकडो वर्षे सेवा देत उभे असलेले दीपस्तंभ ही पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखली जात आहेत. यांची ब्रिटिशकालीन रचना कल्पक आणि अप्रतिम आहे. रात्रीच्यावेळी दूर समुद्रात असणाऱ्या जहाजांना याचा ठिपक्याएवढा दिसणारा प्रकाश अचूक मार्ग दाखवतो. जहाजांसाठी हे दीपस्तंभ ‘आधारस्तंभ’ ठरतात. समुद्रकिनारी सतत वादळी वारे असतात. पावसात तर या सर्वाला उधाण येतं, अशा कठीण प्रसंगीही हे दीपस्तंभ न डगमगता मजबुतीने उभे असतात.
पूर्वी दगड, पोलाद आणि लाकूड या माध्यमातच उभारले जाणारे स्तंभ आज अनेक माध्यमांसह प्रकारात बनवले जातात. अलंकारिकतेबरोबरच स्तंभांना प्राप्त झालेले विविध कंगोरे मानवी मनातही निर्माण होत आहेत. आज गरज आहे ती स्तंभांच्या मजबुतीसह वादळातही न डगमगण्याच्या शिकवणीचे अनुकरण करण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT