शेतकऱ्याचा
सर्पदंशाने मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील खालगाव-शिंदेवाडी येथील शेतकऱ्याला सर्प दंश झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. गणपत गोविंद पाल्ये (५९, रा. शिंदेवाडी, खालगाव, रत्नागिरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपत पाल्ये हे गुरूवारी शेतात काम करत असताना त्यांना सर्पदंश झाला. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------
वृद्धाचा खाडीत
बुडून मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील चवे होलपाटवाडी येथील प्रौढ जाकीमिऱ्या येथील खाडीच्या पाण्यात पडला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांना आढळला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नंदकुमार गोपाळ गवाणकर (५५, रा. चवे होलपाटवाडी, सध्या ः जाकीमिऱ्या, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास जाकीमिऱ्या खाडीत घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार गवाणकर हे बुधवारी जाकीमिऱ्या येथील खाडीत तोल जाऊन पडले होते. शोध घेतला असता ते सापडले नाहीत. शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दुसऱ्या दिवशी गुरूवारी (ता. १२) स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांच्या ते निदर्शनास आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.