-rat१३p२२.jpg-
२४N३१४१२
लांजा ः नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांना निवेदन देताना संतोष जाधव, सचिन जाधव, अनिरूद्ध कांबळे आदी.
----------
लांजा बौद्धजन मंडळाकडून
परभणीतील घटनेचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १३ ः परभणी येथे घडलेल्या घटनेमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा देशभरात निषेध केला जात असून, लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीणच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
परभणी येथे घडलेली घटना अत्यंत समाजउद्रेक होणारी आहे. या घटनेमुळे समाजात अशांतता पसरण्याची दाट शक्यता आहे. राज्याची सुव्यवस्था बिघडू पाहणाऱ्या समाजकंटकाला कडक शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांनी स्वीकारले. यावेळी लांजा बौद्धजन मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सचिन जाधव, कार्याध्यक्ष लहू कांबळे, अनिरूद्ध कांबळे, सल्लागार प्रभाकर कांबळे, दीपक जाधव, अखिल नाईक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.