कोकण

परस्पर सहकार्याने विकासाच्या वाटा शोधाव्यात

CD

31506

परस्पर सहकार्याने विकासाच्या
वाटा शोधाव्यातः पेडणेकर
कुडाळ येथे ''महाराष्ट्र चेंबर''ची बैठक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, आरोग्य, कृषी, दळणवळण या सर्वच क्षेत्रात व्यापक विचार करुन सर्व घटकांच्या एकात्मिक सहभागातून विकासाच्या संकल्पना राबवणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी सरकारवरच अवलंबून न रहाता मुळातच प्रतिभावंत असलेल्या कोकणी माणसाने परस्पर सहकार्याने विकासाच्या वाटा आपणच शोधल्या पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष व जेष्ठ सल्लागार आशिष पेडणेकर यांनी केले.
कुडाळ येथे मसिआच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कोकणचे सुपुत्र आणि मसिआचे कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब यांनी कोकणातील उद्योजकांच्या प्रलंबित समस्यांबाबत मसिआ गांभीर्याने विचार करत असून मसिआचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या विभागाशी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. सदस्य शिवाजी घोगळे व मनोज वालावलकर यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या समस्या मांडल्या. प्रसार माध्यमे व संवाद समितीचे को-चेअरमन अॅड. नकुल पार्सेकर यांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजकांना आवश्यक विद्युतपुरवठा होत नसल्याने तसेच नव उद्योजकांना नवीन पुरवठा वीज वितरण कंपनीला शक्य नसल्याने नवीन उपकेंद्र लवकरात लवकर होण्यासाठी मसिआने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
नजिकच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मसिआ व इतर संस्थाच्या सहकार्याने मायटेक्स २०२५ च्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये नितीन वाळके, राजन नाईक, विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, रंजन चिके, दत्तप्रसाद पेडणेकर, संजय वराडकर, कृष्णा साळसकर आदींनी सहभाग घेऊन आपापल्या सुचना मांडल्या. उद्योगजकानां एक नवी उर्जा व योग्य दिशा देण्यासाठी मायटेक्स २०२५ चे प्रभावी आयोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT