कोकण

वृत्तपत्रं लोकशिक्षणाचे, समाज प्रबोधनाचे कार्य करतात

CD

- rat७p८.jpg-
P२५N३६९३१
लांजा ः विद्यार्थ्यांना गौरवताना आमदार किरण सामंत.

वृत्तपत्रं समाज प्रबोधनाचे कार्य करतात

आमदार किरण सामंत ः निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः निद्रिस्त समाजाला जागे करण्याची भूमिका पत्रकार करत असतात. वृत्तपत्रं लोकशिक्षणाचे व समाज प्रबोधनाचे कार्य करत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारिता अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. एखाद्याच्या हातून घडणारी चूक एखाद्या आरशाप्रमाणे दाखवून देण्याचे काम पत्रकार करतात, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या लांजा शाखेतर्फे पत्रकार दिनानिमित्त लांजा येथील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, लांजा तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा न्यु एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम वंजारे, लांजा माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे, जिल्हा बँकेचे संचालक महेश खामकर, नगरसेवक नंदराज कुरूप, सचिन भिंगार्डे, कल्पना कॉलेजचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष संजय साळवी, संतोष कोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान आमदार सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात प्राथमिक गट ः विधी धुर्ये (जि. प. शाळा शिरवली), मृणाली चव्हाण (जि. प. शाळा वेसुर्ले), कस्तुरी गावडे (जि. प. शाळा पालू न.१), हर्षदा बावधने (प्रतापराव माने विद्यालय भांबेड), तीर्था नेवरेकर (जि. प. शाळा कोट नं १). माध्यमिक गट ः श्रेया चाचे (न्यु इंग्लिश स्कूल लांजा), प्रीती निब्दे (श्रीराम विद्यालय वेरवली), चैत्राली प्रिंदावणेकर (प्रतापराव माने विद्यालय भांबेड), पायल पांचाळ (न्यु इंग्लिश स्कूल वनगुळे), अनुष्का बने (न्यु इंग्लिश स्कूल कोचरी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT