कोकण

मंडणगड : स्थलांतरामुळे गावे ओस; समृद्धीच्या वाटा मंदावल्या

CD

N36939

समस्या स्थलांतराची...- भाग - २

गावे पडली ओस, समृद्धीच्या वाटा मंदावल्या
मंडणगडमध्ये रोजगारासह शिक्षणाची समस्या ; बंद घरांमुळे इतर व्यवसाय अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ : स्पर्धेच्या युगात रोजगार निर्मितीसह शैक्षणिक क्षेत्र अधिक विस्तारित न झाल्यामुळे मंडणगड तालुक्यातील कर्त्या लोकांनी उपजीविकेसाठी महानगरांकडे स्थलांतर केले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचा अभाव कायम राहिल्यामुळे घरे कुलूपबंद झाली असून, गावे ओस पडलेली आहेत. परिणामी, नैसर्गिक वरदान लाभलेल्या तालुक्यातील गाव समृद्धीच्या वाटा मंदावल्या आहेत. रोजगार निर्मितीने त्या पुन्हा नव्याने वर्दळीच्या करण्याची गरज आहे.
तालुक्यात रोजगार निर्मितीत तत्कालीन लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांना अपयश आले आहे. त्यामुळे कर्ती लोकसंख्या प्रचंड प्रमाणात महानगराकडे स्थलांतरित झाल्याचे वास्तव आहे. शहरीकरणामुळे गावपण संपत चालले आहे. लोकसंख्या घटते आहे. गाव संस्कृती बदलली आहे. काही गावे तर मुकी झाली व काहींची अवस्था बिकट झाली. गावात असणाऱ्या दुकानांवर त्याचा परिणाम होऊन गावोगावी असणारी किरकोळ, किराणा, खाऊंची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांनी देखील नाइलाजास्तव नोकरीची वाट धरली. गावातील शाळा पटसंख्येअभावी बंद पडू लागलेल्या आहेत. रोजगार या समस्यमुळे किती गंभीर परिणाम होतात, हे दिसून येत आहे. गावातील माणसे दिसेनाशी झालेली आहेत. रोजगार निर्मितीचा उद्देश सफल करण्यासाठी पावले उचलणे अनिवार्य झाले आहे नाहीतर ही गावे भग्नावस्था कवटाळून बसतील, अशी भीती आहे. गावाचे गावपण टिकवायचं असेल तर आताच यावर उपाययोजना व्हायला हव्यात.

चौकट
रोजगाराबाबत उपेक्षितच
पर्यटन, उद्योग व्यवसाय, कृषी यातून हाताला काम देण्याची मोठी संधी असतानाही याबाबत नेहमीच उदासीनता राहिल्यामुळे आजही मंडणगड तालुका रोजगाराबाबत उपेक्षितच आहे. हाताला काम देण्यात अपयश आल्यामुळे बहुतांशी गावातील कुटुंबे ही मुंबई, पुण्यासारख्या शहरात काम आणि मुलांच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झालेली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या कालचक्रात गावाच्या रचनेत भौगोलिकदृष्ट्या बदल झालेला आहे.

दृष्टिक्षेपात
* मुंबई, पुणे, नालासोपारा, विरारकडे लोकसंख्या स्थलांतरित
* ग्रामीण पातळींवर रोजगार शून्यता
* आर्थिक सक्षमता नसल्याने शिक्षितांची निवडणुकीकडे पाठ
* रोजगार निर्मितीची उदासीन मानसिकता
* लोकसंख्येचा फक्त निवडणुकांसाठी वापर
* २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये ८४७० ने घट
* दहा वर्षांत लोकसंख्येत होतेय घट
-------
चौकट
* गावांची संख्या- १०९
* तालुक्याचे क्षेत्रफळ- ४३८ चौकिमी
* ग्रामपंचायत गट - २५, स्वतंत्र- २४, नगरपंचायत- १
* १९९१ जनगणनेप्रमाणे तालुक्याची आकडेवारी
- एकूण घरे १५ हजार १२९
- लोकसंख्या ६८ हजार
* २००१ जनगणनेप्रमाणे तालुक्याची आकडेवारी
- एकूण घरे १६४८६
- लोकसंख्या ७० हजार ५९३ (पुरुष ३१ हजार ४१२, स्त्रिया ३९ हजार १८१)
* २०११ जनगणनेप्रमाणे तालुक्याची आकडेवारी
- एकूण घरे १६३१४
- लोकसंख्या ६२१२३

* तालुक्याची लोकसंख्या (जनगणनेप्रमाणे)
१९५१- ४९ हजार
१९६१- ५२ हजार
१९७१- ५७ हजार
१९८१- ६२ हजार
------
कोट
तालुका पातळींवर रोजगार नाही. परिणामी, सुशिक्षित व कर्ती पिढी स्थलांतरित होत आहे. बारमाही शेतीसह नैसर्गिक सुबत्तेतून पर्यटनाची दारे खुली होऊ शकतात. पायाभूत सुविधांपलिकडे विकास कधी, याची वाट पाहत मंडणगडकर आहे. जोपर्यंत आश्वासक असे रोजगारक्षम काही निर्माण होत नाही तोपर्यंत मुंबईकर गावाकडे पुन्हा वळणार नाही.
- कल्पेश डोंगरे, मंडणगडवासीय मुंबईकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT