-rat७p३०.jpg -
P25N37040
रत्नागिरी ः नवनिर्माण हायस्कूल मधील स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.
-------
पालकांनी मुलांशी संवाद साधावा
धनंजय कुलकर्णी ः ‘नवनिर्माण’चे स्नेहसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : आजचे जग हे मोबाईलचे, संगणकाचे आहे. दोन्ही पालक व्यस्त असल्यामुळे मुलांना त्यांना वेळ देणे शक्य होत नाही. अशावेळी मुलेही मोबाईलमध्ये रमतात; मात्र त्यामुळे आज गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. म्हणूनच भविष्यातील गंभीर धोके टाळण्यासाठी पालकांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून संवाद साधला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षणसंस्था संचलित नवनिर्माण हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच शाळेच्या (कै.) मोहन खातू क्रीडा संकुलात रंगला. या वेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलीमियाँ परकार, संचालिका सीमा हेगशेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते, सदस्य मृत्युंजय खातू, मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हेगशेट्ये यांनी ''नवनिर्माण''ने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले इंडोर बास्केटबॉल कोर्ट उभारले असून, लवकरच अद्ययावत स्विमिंग पूलही येत्या वर्षभरात येथे तयार होणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.