ड्रोन प्रणालीचे गुरुवारी
भाट्ये येथे उद्घाटन
रत्नागिरी, ता. ७ः ड्रोन प्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ९) सकाळी १० वाजता मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील उद्घाटन भाट्ये समुद्रकिनारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
ड्रोन सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेतली असून मिरकरवाडा व साखरीनाटे बंदरातून ड्रोन सोडण्यात येणार आहे. आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित केले आहे. ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र त्याद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होईल.
ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू शकेल. ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली २ वर्ष व ८ वर्ष मुदतवाढ या कालावधीकरीता भाडेपट्टीने घेण्यात आलेले आहेत. ड्रोन प्रणालीद्वारे अनाधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेबसोलूशन किंवा स्ट्रिमींगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.